BE Nagpur Meet - Kunjilal Peth Bhagwan Nagar

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 ता.2 फेब्रुवारी 2020,रविवार रोजी,

बोधीवृक्ष बुद्धविहार, मानवता शाळेमागे, चंद्रमणी नगर, नागपूर, येथे बुध्दिष्ट आंतरप्रेनअर्स तर्फे मिटींग आयोजित केली होती.
या मिटिंगला,पुज्यनिय भंते हर्षदीप थेरोपुज्यनिय भंते अभयनायक थेरो, बि.ई.शैलेश खडसे (नागपूर जिल्हा कोऑर्डिनेटर), बि .ई.संतोष दाभाडे (जालना जिल्हा कोऑर्डिनेटर), कृणाल रामटेके (कार्यक्रम समन्वयक एम.सी.ई.डी.नागपूर),तसेच बुध्दिष्ट आंतरप्रेअनर्स ची पुर्ण टीम, बि.ई.अमोल नगराळेबि.ई.सचिन मेश्राम, बि.ई.राहूल जारोंडे, बि.ई.समीर रामटेके, बि.ई.पवन खोब्रागडे उपस्थित होते.

मिटींगची सुरुवात, तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेला माल्यार्पण करून, आणि पंचशील वंदना घेऊन सुरवात करण्यात आली.सुरवातीला पुज्यनीय भंते हर्षदीप थेरो,यांनी आजच्या युगातील  बौध्द  नवतरुणांच्या  समोरील बेरोजगारांच्या समस्या ,आणि यावर ऊपाय म्हणून बुध्दिष्ट आंतरप्रेनअर्सचे सामाजिक उपक्रम, याबाबतीत मार्गदर्शन केले. बि.ई. संतोष दाभाडे सर, यांनी, ऊद्योग चालू केल्यानंतरचा स्वतःचा अनूभव तसेच महिलांनो ऊद्योजक व्हायला पाहिजे, याचे आवाहन केले. बि.ई.अमोल नगराळे सर यांनी बुध्दिष्ट आंतरप्रेनअर्सची सुरुवात आणि पार्श्वभूमी याबद्दल माहिती दिली.
बि.ई.शैलेश खडसे सर यांनी नवीन ऊद्योग चालू करण्याकरिता शासकीय योजनाची माहिती,सी.एम. ई.जी.पी.योजना, सीड.मणी.योजना, स्टार्ट.अप.योजना, स्टॅंड.अप.योजना,तसेच यांना आवश्यक असणारी कागदपत्रे याबद्दल माहिती देण्यात आली.याकरिता बुध्दिष्ट आंतरप्रेनअर्स कडुन होणारी मार्गदर्शनपर कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.तसेच कृणाल रामटेके सर यांनी एम. सी.ई.डी. तर्फे होणारे निवासी/अनिवासी ऊद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती आणि फायदे सांगण्यात आली.
या मिटिंगला 70 हून अधिक व्यक्ती हजर राहून सर्वांनी माहिती घेतली आणि सर्व व्यक्ती शासकीय योजनांचा फायदा घेऊन नवीन ऊद्योग चालू करू तसेच बुध्दिष्ट आंतरप्रेनअर्स सोबत येऊन सामाजिक काम करू अशी प्रत्येक व्यक्तीनी ग्वाही दिली.
ही मीटिंग घेण्याकरिता पुज्यनिय हर्षदीप भंते यांची फार मोठी मेहनत आणि मदत झाली करिता मी व्यक्तीशा शैलेश खडसे आणि बुध्दिष्ट आंतरप्रेनअर्स  कडुन  खूप खूप धन्यवाद देतो.
तसेच बि.ई.रत्नदीप कांबळे सर यांचे सुध्दा मी खरंच मनापासून धन्यवाद देतो कि,आपल्या या अतुलनीय  कार्यामूळे बौद्ध समाजातील बेरोजगार तरूणांना एक उद्योजक बनण्याची नवी दिशा मिळाली आहे..धन्यवाद सर..

www.buddhistentrepreneurs.com
www.beaci.inComments