क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १८९ वी जयंती

दिनांक ०३ जानेवारी २०२०    ला
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १८९ वी जयंती, भीमनगर ग्राउंड, गोंदिआ येथे फार उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा राजरत्न आंबेडकर सर होते { त्यांनी फार छान पद्धतीने सावित्रीमाई चे कार्य, शिक्षणाचे महत्व व आजच्या युगात कस जगायला पाहीजे याचे मार्गदर्शन केले }

मुख्य व्यकते मा माधुरी क्षीरसागर होत्या { त्यांनी स्त्री जीवनातील महत्व, कार्यक्षमता आणि विविध स्त्रीच्या विकासाचे मुद्दे मांडले }

मार्गदर्शक - मा स्विटी रत्नादीप कांबळे होत्या { त्यांनी स्त्री चे रोजचे जीवन , जबाबदारी पार पाडून कस एक यशस्वी उद्योजक होता येईल याचे मार्गदर्शन केले, त्यांनी तर काही क्षणातच गर्दी ला आपल्याकडे आकर्षित केले आणि विचारलं आज माझ्यासोबत किती महिला उभ्या आहेत आणि व्यवसायाला जुडू इच्छितात, फार कुतुहलाचा क्षण होता उपस्थित महिलांसाठी }

उदघाटक - मा रत्नादीप कांबळे  सर होते { त्यांच्या कडून लोकांना आजच्या व्यवसायाच्या संधी, मार्गदर्शन तसेच पुढे आपण काय काय करू शकतो, कस जास्तीत जास्त प्रमानात गोंदिया शहरात उद्योजक घडू शकतील या बद्दल मार्गदर्शन केलं }

एक आश्चर्याची गोष्ट होती, एखादया सामाजिक कार्यक्रमा मध्ये बी ई चा स्टॉल असणे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती , त्याबद्दल सरांचे आणि आयोजक समितीचे मनःपूर्वक आभार }

बी ई च्या स्टॉल मध्ये प्रचंड उत्साह बघायला मिडाला, लोकांची आपुलकी बघून एक बी ई मेंबर्स असल्याचा अभिमान वाटला, बी ई च्या माध्यमातून कोणत्याही व्यवसायाची माहिती तसेच मार्गदर्शन काही क्षणात आपल्याला मिडते.

मा आयु.रत्नादीप कांबळे सरांनी इतकी छान अशी सुविधा आमच्यासाठी करून दिली आहे त्या सुविधांचा स्वतः लाभ घेऊन इतरांना पण दयावा यालाच खऱ्या अर्थाने बी ई मेंबर्स होणे असं म्हणता येईल.

या स्टॉल मध्ये खूप लोकांना माहिती तसेच बी ई प्रेसिडेंट मा अभिजित रामटेके सर चे विसिटिंग कार्ड वाटण्यात आले व प्रेरित होऊन जॉईन होण्यासाठी फॉर्म पण भरून घेण्यात आले.

मी परत एकदा बी ई वैशाली खोब्रागडे मॅडम व बी ई समता गणवीर मॅडम व आयोजक समितीचे आभार मानतो ज्यांनी हवामान खात्याच्या अंदाजाला न भिता व ठाम पणे चॅलेंज स्वीकारून ठरलेल्या ठिकाणी च हे भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडले.
💐💐💐🌹🌹💐💐💐

बी ई वैशाली मॅडम आणि बी ई समता मॅडम आम्हाला आपल्या कार्याचा फार अभिमान आहे आणि आपण एक बी ई मेंबर्स आहात हे आमच्या संघटने साठी फार मोलाची गोष्ट आहे

www.buddhistentrepreneurs.com












Comments